पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेटची बैठक,  शेतकय्रांसाठी महत्त्वाची घोषणा!

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेटची बैठक, शेतकय्रांसाठी महत्त्वाची घोषणा!

नवी दिल्ली – शेतकऱ्यांसह मजुर आणि हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्या घटकांसाठी केंद्र सरकारनं काही घोषणा केल्या आहेत. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज पत्रकार परिषद घेत याविषयी माहिती दिली. सरकारने शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला खर्चाच्या दीडपड हमीभाव देण्याचं आपलं वचन पूर्ण केलं आहे. 2020-21 मधील खरीप हंगामातील शेतकऱ्यांच्या 14 पिकांसाठी सरकारने हमीभाव जाहीर केला आहे. या 14 पिकांसाठी शेतकऱ्यांना जवळपास 50-80 टक्के अधिक किंमत मिळेल असं प्रकाश जावडेकर म्हणाले आहेत. तसेच हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्यांनाही सरकार मदत करेल. यात सलून आणि इतर व्यवसायिकांचा देखील समावेश केला जाईल असंही त्यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेटची बैठक आज पार पडली. या बैठकीत केंद्र सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

दरम्यान लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर दोनच दिवसात 1 लाख 70 हजार कोटींचं पॅकेज घोषित करण्यात आलं होतं. 80 कोटी लोकांना अन्न सुरक्षा देण्यात आली. 20 कोटी महिलांच्या बँक खात्यात थेट आर्थिक मदत पोहचवण्यात आली. पीएम किसान योजनेंतर्गत कोट्यावधी शेतकऱ्यांना हप्त्याच्या स्वरुपात मदत देण्यात आली असल्याचं जावडेकर यांनी म्हटलं आहे. या सरकारचं सर्वोच्च प्राधान्य गरिबांनाच आहे. लॉकडाऊनच्या सुरुवातीपासूनच सरकार गरिबांच्या आवश्यकतांबाबत संवेदनशील राहिलं असल्याचं जावडेकर यांनी म्हटलं आहे.

आतापर्यंत सरकारने लॉकडाऊनच्या काळात 80 लाख टनपेक्षा अधिक अन्नधान्य गरजूंपर्यंत पोहचवलं. आत्मनिर्भर भारत अंतर्गत एक राष्ट्र एक राशन योजनेची घोषणा करण्यात आली. त्यामुळे अनेकांना लाभ झाला असल्याचंही जावडेकर म्हणाले आहेत.

COMMENTS