उद्धव ठाकरेंचा पंढरपूर दौरा, शिवसैनिकांची भाजपविरोधात घोषणाबाजी!

उद्धव ठाकरेंचा पंढरपूर दौरा, शिवसैनिकांची भाजपविरोधात घोषणाबाजी!

पंढरपूर – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज पंढरपूर दौऱ्यावर आहेत. यादरम्यान उद्धव ठाकरे युतीसंदर्भात  घोषणा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हजारो शिवसैनिक आज पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत. एकीकडे उद्धव ठाकरे युतीबद्दल आपली भूमिका स्पष्ट करणार का याबद्दल चर्चा सुरु असतानाच पंढरपुरात जमलेल्या शिवसैनिकांनी मात्र उघडपणे भाजपाविरोधी घोषणाबाजी केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे नेमकी युतीबाबत काय घोषणा करणार याकडे लक्ष लागलं आहे.

दरम्यान शिवसैनिकांनी फडणवीस आणि दानवे यांचा एकेरी उल्लेख करत ही घोषणाबाजी केली आहे. ‘रावसाहेब दानवेचं करायचं काय खाली डोकं वर पाय’ तसेच ‘फडणवीसांचं कसं काय खाली मुंडकं वर पाय’ अशी घोषणाबाजी या शिवसैनिकांनी केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS