“रावसाहेब दानवेंना सत्तेची मस्ती, सत्तेचा माज आणि सत्तेची गुर्मी !”

“रावसाहेब दानवेंना सत्तेची मस्ती, सत्तेचा माज आणि सत्तेची गुर्मी !”

जालना – भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे मंत्री अर्जून खोतकर यांच्यामधील वाद आता टोकाला पोहचला असल्याचं दिसून येत आहे. अर्जुन खोतकर यांनी दानवे यांच्यावर जोरदार टीका केली असून रावसाहेब दानवे यांना सत्तेची मस्ती, सत्तेचा माज आणि सत्तेची गुर्मी असल्याचं ते म्हणाले आहेत. तसेच माझ्या धाकामुळे त्यांचे हेलिकॉप्टर जमिनीवर असून जालना जिल्ह्यातील अधिकाऱ्यांवर दानवेंचा प्रचंड दबाव आहे. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि तहसीलदार प्रचंड दहशतीखाली असल्याचंही खोतकर यांनी म्हटलं आहे.

 

दरम्यान दानवे आणि त्यांच्या कुटुंबाने गुत्तेदारी आणि वाळूमधून मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप खोतकर यांनी केला आहे. भाजपाध्यक्ष अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीदरम्यान रावसाहेब दानवे यांना डावलण्यात खुद भाजप नेत्यांचाच हात असून दानवे शिवसेना संपवायला निघाले असल्याचंही अर्जुन खोतकर यांनी म्हटलं आहे.तसेच दानवे यांना ‘मातोश्री’वर बोलवलं नसून खुद्द भाजपच्या नेत्यांचाच त्यांच्यावर विश्वास नाही. दानवे गुप्तता पाळत नाहीत. ते त्या बैठकीच्या पात्रतेचे नाहीत असही खोतकर यांनी म्हटलं आहे.

अधिका-यांना घर गड्यासारखं वागवतात

दानवे जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलीस अधीक्षकांना 4-4 तास बाहेर उभं करतात, त्यांना घर गड्यासारखं वागवतात. दानवे आणि त्यांच्या कुटुंबाकडून सत्तेचा गैरवापर सुरु आहे.” असा आरोपही खोतकर यांनी दानवेंवर केला आहे. एबीपी माझाला दिलेल्या प्रतिक्रियेत खोतकर यांनी दानवेंवर ही टीका केली आहे.

 

COMMENTS