राज्यमंत्री अर्जुन खोतकरांच्या ताफ्यातील पोलीस व्हॅनला अपघात !

राज्यमंत्री अर्जुन खोतकरांच्या ताफ्यातील पोलीस व्हॅनला अपघात !

जालना – शिवसेनचेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या ताफ्यातील पोलीस व्हॅनला अपघात झाला असून या अपघातात एक पोलीस कर्मचारी गंभीर,तर 4  पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती आहे. परतूर तालुक्यातील वाटूर फाट्याजवळ हा अपघात झाला असून मोठी दुर्घटना टळली आहे.

दरम्यान अर्जुन खोतकर हे आज जालना जिल्ह्याच्या दौ-यावर आहेत. आज सकाळी एका कार्यक्रमासाठी जात होते. त्यावेळी परतूर तालुक्यात वाटूर फाट्याजवळ त्यांचा ताफा पोहचला असता त्यांच्या ताफ्यातील पोलीस व्हॅनला अपघात झाला आहे. या अपघाताचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट असून यातील एक पोलीस कर्माचारी गंभीर जखमी झाला आहे तर इतर चार पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती आहे. जखमी पोलिसांना जवळी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याची माहिती आहे.

COMMENTS