शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची काँग्रेसमधून उमेदवारी निश्चित ?

शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची काँग्रेसमधून उमेदवारी निश्चित ?

मुंबई – शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे काँग्रेसमध्ये जाणार असल्याचं जवळपास निश्चित झालं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कारण खोतकर आणि आमदार अब्दुल सत्तार यांची गुरुवारी बैठक झाली होती. त्यानंतर खोतकर यांच्या प्रवेशाला काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी हिरवा कंदिल दाखवला असल्याची चर्चा काँग्रेसच्या गोटात सुरु आहे. त्यामुळे जालना लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे विद्मान खासदार रावसाहेब दानवे यांच्या विरोधात खोतकर हे निवडणूक लढवणार असल्याचं बोलसं जात आहे.

दरम्यान खोतकर आणि सत्तार यांची औरंगाबादमध्ये बैठक झाली. त्यानंतर सत्तार यांनी दोन दिवसात गुड न्यूज मिळेल असे विधान केले होते. तसेच खोतकर हे त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा करणार आहेत, असेही सांगितले होते. त्यामुळे खोतकरांचा काँग्रेस प्रवेश निश्चित मानला जात आहे. खोतकर हे जालना लोकसभा मतदार संघातून लढण्यासाठी आग्रही होते.

मात्र, हा मतदार संघ भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा असल्यामुळे भाजपाने तो सोडण्यास नकार दिला होता. त्यासाठी त्यांनी यांचीही भेट घेतली होती. परंतु शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे खोतकर काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

COMMENTS