महाराष्ट्राशी संबंधित असलेल्या कलम ३७१ बाबत अमित शहांचं मोठं वक्तव्य!

महाराष्ट्राशी संबंधित असलेल्या कलम ३७१ बाबत अमित शहांचं मोठं वक्तव्य!

नवी दिल्ली – जम्मू आणि काश्मीर राज्याच्या विशेष दर्जाचा आधार असलेला ‘अनुच्छेद ३७०’ रद्द करण्याबाबतचे विधेयक राज्यसभेनंतर लोकसभेतही मंजूर करण्यात आलं आहे. ३५१ विरुद्ध ७२ मतांनी हे विधेयक मंजूर करण्यात आलं. यावेळी जम्मू-काश्मीरच्या विभाजनाचं विधेयकही ३६६ विरुद्ध ६६ मतांनी मंजूर करण्यात आलं. कलम ३७० हे काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम हटवण्यात आल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रात लागू असलेल्या कलम ३७१ बाबतही मोठ वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्र आणि पूर्वोत्तर भारतातील कलम ३७१ हटवण्याचा केंद्र सरकारचा कुठलाही विचार नसल्याचं अमित शहा यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान जम्मू-काश्मीरमधी कलम 370 नंतर महाराष्ट्रातील कलम 371 हटवण्यात येणार असल्याची चर्चा होती. परंतु असा कोणताही मुद्दा नसल्याचं शाह यांनी स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्रातील कलम ३७१

कलम ३७१ मधील मुंबई पुनर्गठन अधिनियम १९६० मधील संशोधनानुसार कलम ३७१ (२) अन्वये १ मे १९६० रोजी महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांवर हे कलम लागू करण्यात आले होते.

या कलमानुसार गुजरात या नव्या राज्याची निर्मिती करण्यासाठी कच्छ आणि सौराष्ट्र ही राज्ये मुंबई प्रांतापासून वेगळी करण्यात आली.

त्यानंतर मुंबई राज्याचे नामकरण महाराष्ट्र असे करण्यात आले.

या कलमातील तरतुदींनुसार विदर्भ आणि मराठवाडा हे विभाग महाराष्ट्रात विलीन करण्यात आले होते.

COMMENTS