मुख्यमंत्र्यांविरोधात निवडणूक लढवणाय्रा आशिष देशमुखांनी गडकरींबाबत केलं खळबळजनक वक्तव्य!

मुख्यमंत्र्यांविरोधात निवडणूक लढवणाय्रा आशिष देशमुखांनी गडकरींबाबत केलं खळबळजनक वक्तव्य!

नागपूर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात निवडणूक लढवणारे काँग्रेसचे उमेदवार आशिष देशमुख यांनी भाजप नेते नितीन गडकरींबाबत खळबळजनक वक्तव्य केलं आहे. नितीन गडकरी मला पितृतुल्य असून त्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे असं वक्तव्य आशिष देशमुख यांनी केलं आहे. तसेच मुख्यमंत्री विदर्भ द्रोही आहेत, त्यांनी वेगळ्या विदर्भ राज्यासाठी काहीच केले नाही, त्यामुळे यंदा विदर्भात आणि मुख्यमंत्र्यांच्या दक्षिण पश्चिम या मतदारसंघात परिवर्तन घडेल असा दावाही आशिष देशमुख यांनी केला आहे.

दरम्यान देशमुख यांनी का काँग्रेस पक्षाकडून दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे या मतदारसंघात त्यांची थेट लढत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत होणार आहे. परंतु अशातच त्यांनी  नितीन गडकरी मला पितृतुल्य असून त्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे असं वक्तव्य आशिष देशमुख यांनी केलं आहे. त्यामुळे नितीन गडकरी देशमुख यांना मदत करतील का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

COMMENTS