मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या एकेरी उल्लेखाबाबत आशिष शेलार यांचं स्पष्टीकरण !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या एकेरी उल्लेखाबाबत आशिष शेलार यांचं स्पष्टीकरण !

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या एकेरी उल्लेखाबाबत आशिष शेलार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मी व्यक्तीगत कुणाचा उल्लेख केलेला नाही. मात्र तरीही जर कुणाची भावना दुखावली गेली असेल तर मी माफी मागतो, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. मी मुख्यमंत्री महोदयांचा एकेरी उल्लेख केलेला नाही. कुठल्याही राजकीय नेत्याचा वैयक्तिक उल्लेख केलेला नाही. ती आमची संस्कृती, प्रथा परंपरा नाही. आम्ही सवाल उपस्थित केला आहे त्यावर ठाम आहोत. त्या सवालातील भाषेमुळे जर कोणाचा अपमान झाला असेल तर त्याची क्षमाही मागू, क्षमा मागतो.

दरम्यान सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन टीका करताना, आशिष शेलार यांनी कायदा लागू न करणं म्हणजे तुझ्या बापाचं राज्य आहे का, असं म्हटलं होतं. त्याबाबत त्यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिलं. तसेच सवाल आमचा जो आहे, तो स्पष्ट आहे, अफजल गुरुची बरसी मनवणारे, संविधानाचा अपमान करणारे, भारत तेरे तुकडे तुकडे म्हणणारे, शरजीलच्या समर्थनार्थ जाणारे, या सर्वांच्या मागे जो जो राजकीय पक्ष राहील, तो संविधानाच्या विरोधात उभा आहे. त्याला आम्ही खडे सवाल करत राहू असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

COMMENTS