मंत्रीमंडळातील ‘सखाराम बायंडर’ प्रवृत्तींचं काय करायचं

मंत्रीमंडळातील ‘सखाराम बायंडर’ प्रवृत्तींचं काय करायचं

मुंबई – राज्यपालांचं काय करायचं याचं चिंतन करण्यापेक्षा मंत्रीमंडळातील सखाराम बायंडर प्रवृत्तीचं काय करायचं, याचं चिंतन करा, असा टोला भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेला लगावला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी विमान उड्डाणाच्या वादावर शिवसेनेने ‘सामना’तून या राज्यपालांचे करायचं काय? हा भाजपचा प्रश्न असल्याचं म्हटलं. याला उत्तर देताना आशिष शेलार यांनी हा टोला लगावला. सध्या राज्यात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन राजकारण तापलं आहे. कारण या प्रकरणात भाजपने वनमंत्री आणि शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांचं नाव घेतलं आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी विमान उड्डाणाचा वाद सुरु असताना आता पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन ठाकरे सरकार टीकेचं धनी होत आहे. दरम्यान, आज शिवसेनेने ‘सामना’तून या राज्यपालांचं करायचं काय? हा भाजपचा प्रश्न असं म्हटलं आहे. याला उत्तर देताना आशिष शेलार यांनी जोरदार टोला लगावला. “राज्यपालांचे करायचे काय?असा प्रश्न पडलाय? म्हणजे भारतरत्न महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेचे करायचे काय? असं विचारताय का? तीच तुमची खरी अडचण आहे का? ठाकरे सरकार आल्यापासून हेच तर सुरु आहे. घटनेनुसार शपथ घेतली नाही, घटनेनुसार सभागृहात वागत नाही. घटनेनुसार विधिमंडळाचे कामकाज होत नाही. घटनेनुसार आमदारांना दिलेले हक्क तुम्हाला मान्य नाही. पंतप्रधान, राज्यपाल, न्यायाधीश अशा घटनात्मक पदांचा आदर करीत नाही. राज्यपालांचे करायचं काय? यापेक्षा जमलं तर मंत्रीमंडळातील “सखाराम बायंडर” प्रवृत्तींचे करायचे काय? यावर चिंतन करा,” असा आशिष शेलार यांनी जोरदार टोला लगावला.

COMMENTS