काँग्रेसची तीन दिवसीय बैठक संपन्न, लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष सज्ज !

काँग्रेसची तीन दिवसीय बैठक संपन्न, लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष सज्ज !

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेसची तीन दिवसीय महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेसनं 42 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली दि. १५, १६ व १७ नोव्हेंबर रोजी प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे बैठका पार पडल्या. या बैठकांमध्ये मोठ्या संख्येने आलेल्या इच्छुक उमेदवारांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली असून संपूर्ण ताकतीनिशी काँग्रेस पक्ष आगामी लोकसभा निवडणूकीसाठी सज्ज असल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

दरम्यान गुरुवार दि. १५ नोव्हेंबर रोजी मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र, दि. १६ नोव्हेंबर २०१८ विदर्भ व उत्तर महाराष्ट्र व शनिवार दि. १७ नोव्हेंबर रोजी कोकण विभागातील सर्व लोकसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने इच्छुक उमेदवारांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली. राज्यभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये असणारा उत्साह व काँग्रेस पक्षाने काढलेल्या जनसंघर्ष यात्रेला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहता. संपूर्ण महाराष्ट्र काँग्रेसच्या पाठीशी उभा असल्याचे चित्र असल्याचंही यावेळी अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

COMMENTS