खासदार अशोक चव्हाण राज्यात परतणार, ‘यांना’ देणार नांदेड लोकसभेची उमेदवारी ?

खासदार अशोक चव्हाण राज्यात परतणार, ‘यांना’ देणार नांदेड लोकसभेची उमेदवारी ?

भोकर – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण हे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात परतणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच ते भोकर या त्यांच्या मतदारसंघातून आगामी निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरु आहे. अशोक चव्हाण यांच्याकडे राज्याचे भावी मुख्यमंत्री म्हणून पाहिलं जात असून राज्यात पुन्हा काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी त्यांच्याकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. तसेच अशोक चव्हाण जर राज्यात आले तर नांदेड लोकसभेची जागा कायम राखण्यासाठी त्यांचे समर्थक आणि माजी राज्यमंत्री डी.पी.सावंत यांना नांते देडमधून लोकसभेची उमेदवारी देणार असल्याचंही बोललं जात आहे.

दरम्यान मागच्या वर्षी झालेल्या निवडणुकीत अशोक चव्हाण यांनी नांदेड-वाघाळा महापालिकेत काँग्रेसला एकहाती सत्ता मिळवून दिली आहे. तसेच यावर्षी सरकारविरोधात काँग्रेसनं त्यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष यात्रा काढली होती. जीएसटी, नोटांबदी, वाढती महागाई आणि बेरोजगारीचे प्रश्‍न, शेतकरी आत्महत्या, फसलेली कर्जमाफी, बोंडआळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत नाही यासह राज्यातील अनेक प्रश्नांवरून काँग्रेसने केंद्र आणि राज्य सरकारचे वाभाडे काढले होते.  सत्ताधारी भाजप-सेना सरकारच्या विरोधातील वातावरण पाहता राज्यात सत्तांतर होणार असा अंदाज काँग्रेस-राष्ट्रवादीकडून वर्तवला जात असून या पार्श्‍वभूमीवर अशोक चव्हाणांव्यतीरीक्त काँग्रेसकडे दुसरं नेतृत्व सध्या तरी दिसत नाही.

COMMENTS