…तर सरकार चालणार कसे ?  – अशोक चव्हाण

…तर सरकार चालणार कसे ? – अशोक चव्हाण

मुंबई – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राज्याचे गृहमंत्री असणारे मुख्यमंत्री आठवडभरापासून मराठा आंदोलनाच्या भीतीने घराबाहेर पडायला घाबरत आहेत एवढी नामुष्की त्यांच्यावर ओढावली आहे. राज्याचे प्रमुख असणारे मुख्यमंत्रीच नजरकैदेत असतील तर सरकार चालणार कसे? असा सवाल चव्हाण यांनी केला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेचा विश्वास गमावला असल्यामुळे त्यांना सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार नसून त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणीही अशोक चव्हाण यांनी आज केली आहे.

दरम्यान मला झेड प्लस सुरक्षा आहे अशा वल्गना करणा-या मुख्यमंत्र्यांनी या झेड प्लस सुरक्षेमध्ये स्वतःला कैद करून घ्यावे लागले आहे. मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी तात्काळ अधिवेशन बोलवावे ही काँग्रेस पक्षाची मागणी आहे. विशेष अधिवेशन केव्हा बोलावणार हे सरकारने स्पष्ट करावे असंही अशोक चव्हाण यांनी यावेली म्हटलं आहे.राज्य सरकारने मागासवर्गीय आयोगाला माहिती मिळवून देणे ही सरकारची जबाबदारी आहे. परंतु ज्या संस्थांकडून सर्वेक्षण केले जात आहे त्या संस्थांच्या विश्वासहर्तेबद्दल शंका उपस्थित केली जात असल्याचंही चव्हाण यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS