‘बीजेपी’से बेटी बचाओ म्हणण्याची वेळ आली आहे – अशोक चव्हाण

‘बीजेपी’से बेटी बचाओ म्हणण्याची वेळ आली आहे – अशोक चव्हाण

मुंबई – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार अशोक चव्हाण यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. देशात बलात्कारच्या घटना अतिशय गंभीर घडल्या असून भाजप शासनाला कृति करण्यास किंवा पंतप्रधानांना यावर प्रतिक्रिया देण्यास जवळपास 11 ते 12 दिवस लागले असल्याची टीका अशोक चव्हाण यांनी केली आहे. ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ यापेक्षा ‘बीजेपी से बेटी बचाओ’ असे म्हणण्याची वेळ  सामान्य माणसावर आली असल्याचं चव्हाण यांनी म्हटलं आहे. तसेच  मुलींच्या लैंगिक शोषणाच्या विविध घटनांमध्ये  भाजपचे पदाधिकारी आमदारच गुंतलेले आहेत. त्यामुळे बीजेपीसे बेटी बचाओ म्हणण्याची वेळी आली असल्याचं ते म्हणाले आहेत

काँग्रेसचं शिष्टमंडळ नाणारला जाणार

दरम्यान नाणार प्रकल्पाबाबतही चव्हाण यांनी टीका केली असून स्थानिकांचे म्हणणे विचारात  घेऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावावेत. तसेच लोकांची घरं दारं उध्वस्त करून, त्यांच्या पुनर्वसनाचा विचार न करता हा प्रकल्प कधीच मान्य होणार नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तसेच याबाबत 20 एप्रिलला काँग्रेसचं शिष्टमंडळ नाणारला जाणार असून प्रकल्पग्रस्तांची घेणार भेट घेणार असून आंदोलनात स्थानिक लोकांसोबत राहण्याची काँग्रेसची भूमिका असंल्याचंही चव्हाण यांनी म्हटलं आहे.

राजकारणासाठी बाबासाहेबांचं नाव वापरलं

सेना-भाजप सरकारने राजकारणासाठी बाबासाहेबांच नाव वापरलं असून त्यांनी प्रत्यक्ष काहीच केलं नसल्याची टीकाही चव्हाण यांनी केली आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची घोषणा होऊन तीन वर्षे झाले मात्र अद्याप काहीच काम झालं नसल्याचही ते म्हणाले आहेत.

 मंत्रालयात बाजार

शेतक-यांवर शेतमाल मंत्रालयात आणून टाकण्याची वेळ आली आहे. मंत्रालयातच आता बाजार सुरू झाला असून गरिबांची कामं होत नाहीत.तसेच अधिकाऱ्यांमुळे शेतकऱ्यांची पिळवणूक होत असून बहुमताच्या जोरावर रेटून नेण्याचा प्रयत्न सरकार करत आहे असल्याची टीकाही चव्हाण यांनी केली आहे.

COMMENTS