अशोक चव्हाणांचा मुख्यमंत्र्यांबाबत खळबळजनक गौप्यस्फोट !

अशोक चव्हाणांचा मुख्यमंत्र्यांबाबत खळबळजनक गौप्यस्फोट !

मुंबई – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. भाजपात घेण्यासाठी मुख्यमंत्री काँग्रेस आमदारांना आणि मला रोज सतत फोन करत असल्याचं चव्हाण यांनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री आणि भाजपातले इतर नेते करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी भाजपाला मदत करत असल्याचा आरोपही अशोक चव्हाण यांनी केला आहे. चव्हाण यांच्या आरोपामुळे काँग्रेस -राष्ट्रवादी आघाडीत बिघाडी येणार असल्याचं दिसत आहे.

दरम्यान चव्हाणांच्या वक्तव्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीत बिघाडी होऊन दोन्ही पक्ष स्वबळावर लढणार का? याबाबत तर्क लढवले जात आहेत. बहुजन वंचित आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांना आम्ही सोबत घेण्यासंबंधी विचार करत आहोत. त्याबाबत त्यांच्याशी चर्चाही करू मात्र अंतिम निर्णय त्यांना घ्यायचा आहे असेही अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मोठे बदल पहायला मिळू शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे.

COMMENTS