काँग्रेसच्या ‘या’ आमदाराची पक्षातून हकालपट्टी, राधाकृष्ण विखेंबाबतही अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया!

काँग्रेसच्या ‘या’ आमदाराची पक्षातून हकालपट्टी, राधाकृष्ण विखेंबाबतही अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया!

जालना – पक्षविरोधी भूमिका घेतल्याने सिल्लोडचे काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांची पक्षातून हकालपट्टी केल्याची घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलीय.आज जालना लोकसभा मतदार संघातील आघाडीचे उमेदवार विलास औताडे यांच्या प्रचारार्थ चव्हाण यांची भोकरदनमध्ये जाहीर सभा झाली,या सभेत सत्तारांच्या हकालपट्टीची घोषणा करण्यात आली.मात्र विखे यांच्याबाबत पक्ष श्रेष्ठींना माहिती देण्यात आली असून पक्ष श्रेष्ठी याबाबत निर्णय घेतील असंही चव्हाण म्हणाले.

प्रकाश आंबेडकर यांनी केलेले आरोप चुकीचे असून मी निवडणूकीत 100 कोटी खर्च केले असतील आणि माझ्या सासूच्या नावावर 4 फ्लॅट असतील तर त्याची चौकशी करा असंही चव्हाण म्हणाले.काल प्रकाश आंबेडकर यांनी चव्हाण यांच्यावर लोकसभा निवडणुकीत 100 कोटी रुपये वाटल्याचा आरोप केला होता त्यावर चव्हाण यांनी उत्तर दिलं.साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी करकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी सहमत आहे का असा सवाल देखील चव्हाण यांनी उपस्थित केला.

COMMENTS