कर्जासाठी बँकांवर मोर्चे काढा- अशोक चव्हाण

कर्जासाठी बँकांवर मोर्चे काढा- अशोक चव्हाण

मुंबई – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सरकारवर जोरदार हल्ला केला आहे. शेतकऱ्यांची दुरावस्था झाली आहे राज्यात 15 हजार आत्महत्या होऊनही सरकार पहायला तयार नाही. पूर्वी फोटो काढण्यासाठी का होईना येत होते, आता मात्र तेही होताना दिसत नाही. या सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, कर्जमाफी नाही, पीकविमा मिळत नाही, कर्ज देखील मिळत नाही म्हणून यापुढे गावागावात कर्ज मिळवण्यासाठी बँकांवर मोर्चे काढा अशा सूचना अशोक चव्हाण यांनी दिल्या आहेत. विजय मल्ल्या चालतो मग शेतकरी का नाही ? असा सवाल त्यांनी औरंगाबाद येथे उपस्थित केला. उद्योगपती पैसे घेऊन परदेशात पळत आहेत, गरिबाला मात्र आत्महत्या करावी लागत आहे हे दुर्दैवास्पद असल्याचही चव्हाण यांनी म्हंटल.

दरम्यान अन्न मिळत  नसल्यामुळे रोज कित्येक लोक मरण पावतात, अशी परिस्थिती असताना मोदी  सर्वांना योगा करायला लावत आहेत. साखरेला भाव मांडून द्या, म्हणजे उसाला भाव मिळेल मात्र तसं होत नाही. हे फक्त योगा करायला लावत आहेत. सर्व ऑनलाईन करत असताना सरकार ऑफलाईन झालं आहे, अगोदर विजेची सोय करा, त्यानंतरच सर्व ऑनलाईन करा अस सूचक वक्तव्यही  अशोक चव्हाण यांनी केलं आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आघाडीवर बोलताना ते म्हणाले की, मतांचं विभाजन टाळलं पाहिजे, कालच राष्ट्रवादीसोबत चर्चा झाली त्यांच्यासोबत आघाडी करण्याच्या हालचाली सुरू आहेत. राज्यात सर्वच ठिकाणी जातीयवाद करून मत विभाजन करण्याचं काम भाजप करत आहे. म्हणून आता एकत्र येण्याची गरज असल्याचंही यावेळी चव्हाण यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधींना जळगावच्या घटनेवर नोटीस पाठवली, मनुवाद्यांना खतपाणी टाकण्याचं काम भाजप करत आहे. राज्यात भ्रष्टाचार वाढला, सामान्यांना न्याय मिळेल असं वाटत नाही, सर्वसामान्यांना न्याय मिळवण्यासाठी राज्यात, केंद्रात काँग्रेसचं सरकार आली पाहिजे, त्या साठी तयार व्हा, अश्या सूचना अशोक चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.

COMMENTS