नारायण राणेंच्या घरवापसीबाबत अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया !

नारायण राणेंच्या घरवापसीबाबत अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया !

मुंबई – महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि भाजपच्या मदतीने खासदार झालेले ज्येष्ठ नेते नारायण राणे हे काँग्रेसमध्ये घरवापसी करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नारायण राणेंकडून असा कोणताही प्रस्ताव आला नसल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. नारायण राणे हे भाजपवर नाराज सून ते काँग्रेसमध्ये पुन्हा घरवापसी करणार असल्याची चर्चा होती. परंतु चव्हाण यांनी दिलेल्या या प्रतिक्रियेमुळे राणे काँग्रेसमध्ये जातील असं दिसत नाही.

आगामी निवडणुकीत शिवेसना-भाजमध्ये युती होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. अशातच राणे आणि शिवसेनेमधील वाद जास्तच वाढत असल्याचं दिसत आहे. तसेच भाजपसोबत शिवसेनेला घेण्यास राणेंचा विरोध असल्याची माहिती आहे. त्यामुळे शिवसेना – भाजपची युती झाली तर ते पुन्हा काँग्रेसमध्ये जातील असं बोललं जात होतं.

दरम्यान काही दिवसांपूर्वी शरद पवार कोकणच्या दौऱ्यावर असताना राणेंच्या भेटीला त्यांच्या निवासस्थानी गेले होते. त्यामुळे राणे राष्ट्रवादीत जाणार का अशीही चर्चा होती. मात्र नारायण राणे हे सध्या भाजपसोबत आहेत. त्यांनी आधी भाजपची साथ सोडावी. त्यानंतर त्यांना सोबत घेण्याबाबत विचार करू,’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली होती. त्यामुळे ते राष्ट्रवादीतही जाणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

 

COMMENTS