तर पेट्रोलचे दर 60 रुपये करू, अशोक चव्हाणांचं जनतेला आश्वासन !

तर पेट्रोलचे दर 60 रुपये करू, अशोक चव्हाणांचं जनतेला आश्वासन !

जालना – येत्या निवडणुकीत काँग्रेसचे सरकार आले तर पेट्रोल 60 ते 65 रुपयांच्या आत आणू असे आश्वासन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिले आहे. जालना येथे मंगळवारी काँग्रेसने जनसंघर्ष यात्रा व दुष्काळ पाहणी दौरा केला. यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलत असताना त्यांनी भाजप सरकावर जोरदार टीका केली. भाजपने फेकूगिरी करत सामान्यांना चकवा दिला असून सध्या पेट्रोल 87 रूपयांच्या घरात गेले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत या सरकारला त्यांची जागा दाखवून द्या असं आवाहनही यावेळी त्यांनी जनतेला केलं.

दरम्यान आम्ही दिवसा दुष्काळाची पाहणी करीत आहोत. मात्र सत्ताधारी रात्री मोबाइलच्या उजेडात दुष्काळाची पाहणी करीत आहे. राज्य शासनाने जलयुक्त शिवार योजना झोलयुक्त केली. सरकारने फेकूगिरी करीत सर्वांना चकवा दिला. अजुन ही जणधन खात्यात एक रुपया ही जमा झाला नाही. पेट्रोल, डिझेल, गॅसचे भाव काढले आहेत. जर 2019 मध्ये काँग्रेसचे सरकार आले तर पेट्रोलचे भाव 60 ते 65 रूपयांच्या आत आणू आणि जर हेच सरकार ठेवले तर पेट्रोल 100 रुपये पार करीन असंही यावेळी चव्हाण यांनी म्हटलं आहे.

या सरकारला माज आला आहे का? राज्यात दुष्काळ जाहीर करुन राज्याच्या तिजोरितून का मदत दिली जात नाही असा सवाल ही त्यांनी यावेळी केला. शासनाने चारा छावन्यासह शेतकऱ्यांना दुष्काळी मदत द्यावी. मात्र हे होताना दिसत नसल्याचंही चव्हाण यांनी म्हटलं आहे.

यावेळी विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, जिल्हा अध्यक्ष सुरेशकुमार जैथलिया, माजी आमदार कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा संगीत गोरंट्याल आदी नेते उपस्थिती होते.

COMMENTS