अशोक चव्हाणांची उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौ-यावर टीका ! VIDEO

अशोक चव्हाणांची उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौ-यावर टीका ! VIDEO

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आजपासून अयोध्येच्या दौ-यावर गेले आहेत. उद्धव ठाकरेंच्या या दौ-याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांचा हा केवळ राजकीय स्टंट असून रामाचे नाव घ्यायचे आणि मते मागायची हे नवीन नाही. जेव्हा आठवेल तेव्हा हिंदू मुस्लिम मतांमध्ये ध्रुवीकरण करायचं अशी टीका अशोक चव्हाण यांनी केली आहे. तसेच शिळ्या कढीला ऊत आणायचा हा प्रकार असून दिलेली आश्वासनं पाळली नाही तर असे प्रकार करावे लागतात असा टोलाही चव्हाण यांनी यावेळी लगावला आहे.

COMMENTS