तेव्हा फडणवीस यांच्या मनाला वेदना झाल्या नाहीत का? तेव्हा तर कोरोना नव्हता – अशोक चव्हाण

तेव्हा फडणवीस यांच्या मनाला वेदना झाल्या नाहीत का? तेव्हा तर कोरोना नव्हता – अशोक चव्हाण

मुंबई – सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला आहे. फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्य सरकारने मेगाभरती करणार नाही, अशी भूमिका मांडली, तेव्हा त्यांच्या मनाला वेदना झाल्या नाहीत का? तेव्हा तर कोरोना नव्हता असा सवाल चव्हाण यांनी विचारला आहे.

दरम्यान फडणवीस यांनी 15 सप्टेंबर 2020 पर्यंत भरती न करण्याची राज्य सरकारची भूमिका मनाला वेदना देणारी असल्याचे म्हटले होते. परंतु डिसेंबर 2018 मध्ये फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्य सरकारने आम्ही मेगाभरती करणार नाही, अशी भूमिका मांडली तेव्हा त्यांच्या मनाला वेदना झाल्या नाहीत का? तेव्हा तर कोरोना नव्हता” असा सवाल अशोक चव्हाण यांनी विचारला आहे. तसेच सरकारने नोकरभरती बंद करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. आम्ही कोरोनामुळे भरती प्रक्रिया थांबवली आहे. हा जीआर काल काढलेला नाही, 4 मे रोजी काढला आहे असे चव्हाणांनी स्पष्ट केले आहे.

COMMENTS