बांधकाम मंत्री अशोक चव्हाण पुन्हा नाराज, बाळासाहेब थोरात म्हणतात… !

बांधकाम मंत्री अशोक चव्हाण पुन्हा नाराज, बाळासाहेब थोरात म्हणतात… !

मुंबई – काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे पुन्हा एकदा नाराज झाले असून त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विभाजनाचा प्रस्ताव आपल्याला न विचारता मंजुरीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत मांडल्यांने, अशोक चव्हाण नाराज आहेत. अशोक चव्हाण यांनी कडक शब्दात अधिकारी परस्पर प्रस्ताव देत असल्याने नाराजी व्यक्त केली आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विभाजनाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र तो अशोक चव्हाण यांनाच माहित नव्हता. आपल्याला माहिती न देता, अधिकाऱ्यांनी असा प्रस्ताव तयार करुन, थेट मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरीसाठी सादर केला जातो, हे अत्यंत असमन्वयाचं असल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत नाराजी असल्याचा सूर असल्याचं पुन्हा एकदा दिसत आहे.

दरम्यान या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी अशोक चव्हाण यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीत नाराजी असल्याचे वृत्त फेटाळून लावले. मी अशोक चव्हाण यांना भेटलो, यामध्ये काहीही नवीन नाही. आमच्या भेटी होतच असतात. तसेच अशोक चव्हाण यांच्या खातेविभाजनचा निर्णय एकमताने  घेतला जाईल, असेही बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले आहे.

COMMENTS