अहमदनगर दक्षिण लोकसभेची जागा अदलाबदल करण्याची अशोक चव्हाणांची मागणी, ‘यांना’ देणार उमेदवारी ?

अहमदनगर दक्षिण लोकसभेची जागा अदलाबदल करण्याची अशोक चव्हाणांची मागणी, ‘यांना’ देणार उमेदवारी ?

अहमदनगर – विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील याचे पुत्र सुजय विखे यांनी नगर दक्षिणची लोकसभेची जागा लढवावी अशी मागणी होत असल्यामुळे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी आपण आग्रह धरणाऱ असून, मागील तीनही निवडणूकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा या मतदारसंघात झालेला पराभव लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने जागेत अदलाबदल करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांनी उत्तर महाराष्ट्रातील जनसंघर्ष यात्रेच्या पाथर्डी येथील सभेत केली आहे.

उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेची समारोप अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे करण्यात आलाय. राज्यातील निवडणुका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने बरोबर लढविण्याचा ठरवलय मात्र त्यात जागा वाटपासंदर्भात येत्या 12 तारखेला पहिली बैठक होणार आहे. मात्र राज्यातील काही जागांची अदलाबदल करण्याची मागणी पुढे येतेय. त्यात अहमदनगर दक्षिणची जागा राष्ट्रवादीकडे असल्यान ती काँग्रेससाठी सोडावी असा सुरु उमटतोय या ठिकाणाहुन राधाकृष्ण-विखे यांचे चिरंजीव सुजय विखे निवडणुक लढवणार आहेत त्यांनी तशी तयारीही सुरु केली आहे. त्याच दृष्टीने आज पाथर्डीत जनसंघर्ष यात्रेचा समारोपाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता या सभेत अशोक चव्हाण यांनी आपल्या भाषणात लोकसभा निवडणुकीचा उल्लेख करून डॉ. सुजय विखे पाटील यांच्या सारख्या तरूण नेतृत्वाला संधी देण्यावरही शिक्कामोर्तब केले.

दक्षिण लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी माझ्यासह  माजी मंत्री आ.बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे पाटील प्रयत्न करू आशी ग्वाही देवून खा. अशोकराव चव्हाण यांनी एकप्रकारे पाथर्डी येथील सभेतून दक्षिण मतदारसंघावर काँग्रेस दावा  करणार असल्याचा  सूचक विधान केले आहे.

केंद्रात आणि राज्‍यात आता परिवर्तन केल्याशिवाय आता  स्वस्थ बसायचे नाही. त्या मुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एक एक जागा जिंकण्याची नियोजन करालया हवय आम्ही राष्ट्रवादीशी भांडणार नाही आहेत मात्र काही जागांवर अदलाबदल करावी लागेल. असं म्हटलय. आता शरद पवार नगरची जागा काँग्रेससाठी सोडणार का आणि त्या बदल्यात शिर्डी लोकसभेची जागा घेवुन काँग्रेसला आणखी काय अट घालतात हे येणार्या काळातच स्पष्ट होईल.

COMMENTS