भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असलेल्या  ‘या’ काँग्रेस आमदाराविरोधात विरोधक एकवटले!

भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असलेल्या ‘या’ काँग्रेस आमदाराविरोधात विरोधक एकवटले!

मुंबई – भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असलेल्या काँग्रेस आमदाराविरोधात त्यांच्या मतदारसंघातील सर्व विरोधक एकवटले आहेत. काँग्रेसचे सातारा जिल्ह्यातील माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्याविरोधात मतदारसंघातील सर्वपक्षीयांनी त्यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. गोरे यांच्याविरोधात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची एक बैठकही पार पडली. साताऱ्यातील सर्वपक्षीय बैठकीत भाजपचे माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रभाकर घार्गे, भाजपचे उपाध्यक्ष अनिल देसाई, शिवसेनेचे रणजितसिंह देशमुख, रासपचे जिल्हाध्यक्ष मामुशेठ वीरकर, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सुभाष नरळे यांच्यासह तालुक्‍यामधील विविध पक्षातील कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी गोरे बंधूंना माण-खटावच्या स्थानिक नेत्यांनी एकमुखी विरोध दर्शवला आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला मदत केल्यामुळे गोरे चर्चेत होते. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे गोरे यांच्याविरोधात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी बैठक घेतली. या बैठकीत गोरे बंधूंना माण-खटावच्या स्थानिक नेत्यांनी एकमुखी विरोध दर्शवला आहे. परंतु जयकुमार गोरेंनी मात्र मौन बाळगणंच पसंत केलं आहे.

COMMENTS