गणेशोत्सवानंतर होणार निवडणुकीची तारीख जाहीर?

गणेशोत्सवानंतर होणार निवडणुकीची तारीख जाहीर?

मुंबई – राज्यात विधानसभा निवडणुकीची तारीख कधी जाहीर होते याची प्रतिक्षा असून ही प्रतिक्षा गणेशोत्सवानंतर संपण्याची चिन्हे आहेत. मागील म्हणजेच 2014 च्या विधानसभा निवडणुकीची घोषणा गणेशोत्सवानंतर 12 सप्टेंबर रोजी झाली होती. यावेळीही 2019 च्या विधानसभा निवडणुकीची घोषणा गणेशोत्सव संपल्यानंतर लगेच होण्याची शक्यता आहे. राज्यात 2 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव साजरा होत आहे. 12 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असून या दिवशी गणेश विसर्जन झाल्यानंतर राज्यातील विधानसभा निवडणुकीची तारीख 13 सप्टेंबरनंतर लगेचच जाहीर होऊ शकते.

दरम्यान 2014 च्या विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊन आणि आचारसंहिता 12 सप्टेंबर रोजी लागली होती. तर 15 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 19 ऑक्टोबर रोजी मतमोजणी झाली होती. यावेळीही मतदान आणि मतमोजणीची तारीख त्याच्या जवळपासच असण्याची शक्यता आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक तोंडावर आली असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापत असल्याचं दिसत आहे.

COMMENTS