‘हा’ उमेदवार म्हणतोय माझा पराभव निश्चित आहे !

‘हा’ उमेदवार म्हणतोय माझा पराभव निश्चित आहे !

मुंबई – विधानसभा निवडणुकीसाठी काल मतदान पार पडले. त्यानंतर विविध माध्यमांनी एक्झिट पोल जाहीर केले. यामध्ये कुणाचा विजय होणार तर कोण जिंकणार याबाबतचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. परंतु काही नेत्यांनी एक्झिट पोलवर आपला विश्वास नसून आपणच निवडणूक जिंकणार असल्याचं म्हटलं आहे. परंतु अशातच वरळीमधून आदित्य ठाकरेविरोधात माझा पराभव होणार असल्याचं वक्तव्य मराठी बिग बॉसचे स्पर्धक आणि वरळी विधानसभा मतदारसंघातून  निवडणूक लढणारे अभिजीत बिचुकले यांनी केलं आहे.ठाकरे कुटुंबियांची संपत्ती आणि ताकद यामुळे माझा पराभव निश्चित असल्याचं बिचकुले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान मी महाराष्ट्रातील स्टायलिश नेता आहे. मला फसवाफसवी जमत नाही. जे मी नेहमी कपडे घालतो, जसा राहतो म्हणून लोकांना मी त्यांच्यातला वाटतो. इतर नेते घरात वेगळ्या प्रकारचे कपडे घालतात, मात्र सार्वजनिक ठिकाणी वावरताना खादीचे सफेद कपडेच घालतात.

यातून त्यांचा खोटेपणा उघड होतो,
तसेच मला पराभूत करण्यासाठी ठाकरे कुटुंबियांना पैशाची ताकद लावावी लागली. परंतु ठाकरे कुटुंबियांनी माझ्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केला नाही. तसेच मुंबईकरांनी माझ्यावर खुप प्रेम दाखवल्याबद्दल मी त्यांचा आभारी असल्याचंही बिचकुले यांनी म्हटलं आहे.

COMMENTS