काँग्रेस, राष्ट्रवादीला धक्का, हे आमदार शिवसेना, भाजपच्या संपर्कात?

काँग्रेस, राष्ट्रवादीला धक्का, हे आमदार शिवसेना, भाजपच्या संपर्कात?

मुंबई – लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस- राष्ट्रवादीला जोरदार धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. कारण काँग्रेस- राष्ट्रवादीमधील अनेक आमदार शिवसेना-भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती आहे.माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे, बार्शीचे आमदार दिलीप सोपल आणि उल्हासनागरच्या ज्योती कलानी भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. तर अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. संग्राम जगताप यांनी दक्षिण नगरमधून राष्ट्रवादी काँग्रेससाठी निवडणूक लढली होती पण महापालिका निवडणुकीत नगरसेवकांनी भाजपला केलेली मदत त्यामुळे जगताप हे भाजपमध्ये जातील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान कोकणातील श्रीवर्धन मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार आणि खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे अवधूत तटकरे देखील सेनेच्या मार्गाॉवर असल्याची चर्चा आहे.लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर खचलेल्या विरोधी पक्षातील आमदार आपल्या राजकीय भवितव्यासाठी सत्ताधारी पक्षाची वाट धरत असल्याची चर्चा असून विरोधी पक्षात राहिलो तर आपण निवडून येणार नाही याची भीती काही आमदारांना वाटत असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

त्याचबरोबर जिथे कोणी पक्ष सोडून जात आहे तिथले भाजप सेनेतील स्थानिक नेते आमच्याही संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. त्यामुळे कोणता नेता कोणाच्या पक्षात जाणार
याबाबत लवकरच स्पष्ट होणार आहे.

COMMENTS