शिवसेनेनं दावा केलेल्या ‘या’ मतदारसंघात मित्रपक्षांकडूनही चाचपणी!

शिवसेनेनं दावा केलेल्या ‘या’ मतदारसंघात मित्रपक्षांकडूनही चाचपणी!

पुणे – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील विविध मतदारसंघातून सर्वच राजकीय पक्ष चाचपणी करत आहेत. काही ठिकाणी तर पक्षांकडून अनेक मतदारसंघांवर दावा केला जात आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेनं दावा केला आहे. परंतु तरीही या मतदारसंघात मित्रपक्षांकडून चाचपणी केली जात आहे. मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून गौतम चाबुकस्वार निवडून आले होते. त्यामुळे आमदार या मतदारसंघावर शिवसेनेनं पुन्हा दावा केला आहे. असं असलं तरीही आरपीआय (A) गटाचे अध्यक्ष रामदास आठवले आणि भाजप खासदार अमर साबळे यांच्याकडून चाचपणी सुरु आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर हे देखील या मतदारसंघातून आपल्या मुलाला विधानसभेत पाठवण्यासाठी चाचपणी करीत आहेत.

2009 सालच्या पुनर्रचनेनंतर हा मतदारसंघ स्थापन झाला. पहिल्याच निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा बनसोडे तर दुसऱ्या म्हणजे 2014 च्या विधानसभेत शिवसेनेच्या गौतम चाबुकस्वार हे याठिकाणी आमदार झाले. त्यामुळे आता आगामी निवडणुकीसाठीही शिवसेनेनं येथून दावा केला आहे. परंतु युतीतील मित्रपक्षांकडूनही याठिकाणी दावा केला जात आहे. त्यामुळे मित्रपक्ष हा मतदारसंघ शिवसेनेला सोडणार का हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS