‘या’ नेते आणि बंडखोरांनी भरले उमेदवारी अर्ज !

‘या’ नेते आणि बंडखोरांनी भरले उमेदवारी अर्ज !

मुंबई – राज्यभरातील अनेक नेते आणि पक्षातील बंडखोर नेत्यांनी आज आपले उमेदवारी अर्ज भरले आहेत. कोणी कोणत्या पक्षातून आणि कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला याचा आढावा आम्ही घेण्याचा प्रयत्न केला आहे.

पंढरपूर मतदारसंघ

पंढरपूरमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार भारत भालके यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अनुपस्थिती लावली होती. भालके यांनी पाठवलेल्या चार प्रतिनिधींनी त्यांचा उमेदवारी अर्ज भरला आहे.

अकोला पश्चिम मतदारसंघ

अकोला पश्चिममधून भाजप उमेदवार
गोवर्धन शर्मा आणि अकोला पूर्वेतून रणधीर सावरकर यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.

सांगली – इस्लामपूर मतदारसंघातून बंडखोरी करत निशिकांत पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. पाटील यांनी भाजपमध्ये बंडखोरी करत एक भाजपकडून उमेदवारी अर्ज आणि एक अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. मी भाजप कडून अर्ज भरला आहे पण योग्य योग्य वेळी योग्य निर्णय होईल.
नाही तर कार्यकर्त्यांसाठी अपक्ष म्हनून लढणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. निशिकांत पाटील हे इस्लामपूरचे नगराध्यक्ष आणि भाजपचे नेते आहेत. इस्लामपूरमधून उमेदवारी न मिळाल्याने आणि युतीची जागा शिवसेनेला मिळाल्याने निशिकांत पाटील यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.

बीडमधील परळी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या विद्यमान आमदार पंकजा मुंडे यांंनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे.

सांगली मतदारसंघ

सांगली मतदारसंघात सामाजिक न्यायमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज मिरजेतून भरला आहे.सलग तिसऱ्यांदा मिरजेतून खाडे निवडणूक लढवत आहेत. यावेळी आमचं ठरलंय म्हणत, भाजपच्या रॅलीत सलगरचे सरपंच आणि काँगेसचे नेते तानाजी पाटील आणि काँग्रेसचे नेते आणि माजी पंचायत समिती सभापती अनिल अमटवणे आणि शेकडो काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी होते.जत एक आणि मिरज दोनदा असे सलग तीन वेळा भाजपाकडून सुरेश खाडे निवडून आले आहेत. ते पश्चिम महाराष्ट्रात भाजपचे विधानसभेत निवडून आलेले पहिले आमदार आहेत.

तसेच राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई आर आर पाटील यांनी तासगावमधून उमेदवारी अर्ज भरला आहे.

तसेच सांगली जतमधून भाजपचे आमदार विलासराव जगताप यांनी आपला उमेदवारी अर्ज केला दाखल.

तर जत मधून काँग्रेसचे उमेदवार विक्रम सावंत यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.
तसेच सांगली भाजपचे आमदार सुधीर दादा गाडगीळ यानी सांगलीतून उमेदवारी अर्ज भरला आहे.

सांगली – झांशीच्या राणीची वेशभूषा परिधान करत समाजसेविका जयश्री पाटील यांनी अपक्ष म्हणून भरला उमेदवारी अर्ज दाखल केला. सांगलीतील समाजसेविका आणि हटके स्टाईल ने आंदोलन करण्यासाठी शहरात ओळखल्या जाणाऱ्या समाजसेविका यांनी आज विधानसभेचा उमेदवारी अर्ज हटके स्टाईल ने दाखल केला. झांशीच्या राणीची वेशभूषा परिधान करत त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जनसंवाद यात्रेसमोर जाऊन त्यांनी पूरग्रस्तांना मदत मिळत नसल्याने रॅली समोर जाऊन त्यांनी आंदोलन केले होते. त्यानंतर त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या होत्या. आज त्यांनी झांशीच्या राणीची वेशभूषा करून सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या उमेदवाराला पाहण्यासाठी गर्दी झाली होती.

बीड विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून जयदत्त क्षीरसागर यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला.

आंबेगाव मतदारसंघ पुणे

आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरण्याआधी महाविजय निर्धार मेळावा सुरू केला आहे.

सोलापूर शहर मतदारसंघ

माकपचे माजी आमदार नरसया आडम मास्तरांनी आपल्या पारंपरिक मतदारसंघ सोलापूर शहर मध्य मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

तसेच सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख यांनी आपला उमेदवार अर्ज दाखल केला आहे.

पालघर बोईसर विधानसभा मतदारसंघ

पालघर बोईसर विधानसभेत युतीमध्ये बंडखोरी झाली आहे. भाजपचे संतोष जनाठे यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करीत आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बोईसर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला असून संतोष जनाठे हे भाजपकडून बोईसरमधून इच्छुक होते.

नाशिक पश्चिम मतदारसंघ

नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या युतीच्या उमेदवार सीमा हिरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. परंतु यावेळी अर्ज भरतांना एकही शिवसेनेचा नगरसेवक नव्हता. नाशिक मतदारसंघात भाजप सेनेत संघर्ष अधिक तीव्र आहे. युती झाली असली तरी स्थानिक पातळीवर संघर्ष सुरूच असल्याचं दिसत आहे. तर दुसरीकडे नाशिक मध्य मतदारसंघाच्या युतीच्या उमेदवार देवयानी फरांदे यांनीही आपला भरला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. परंतु यावेळी अर्ज भरतांना वसंत गीते नसल्यानं नाराजीचं ग्रहण कायम असल्याचं दिसत आहे. परंतु सर्वांची नाराजी लवकरच दूर होईल असं देवयानी फरांदे यांनी म्हटलं आहे.

रायगड, श्रीवर्धन मतदारसंघ

रायगडमधील श्रीवर्धन मतदारसंघातून शिवसेना उमेदवार विनोद घोसाळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

डोंबिवली मतदारसंघ

डोंबिवली मतदारसंघातून राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, महापौर विनिता राणे उपस्थित होते.

नवी मुंबई

नवी मुंबईमधून भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी बेलापूर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला आहे.

चंद्रपूर चिमूर विधानसभा मतदारसंघ

चंद्रपूर जिल्ह्यात भाजपमध्ये बंडखोरीला सुरुवात, चिमूर विधानसभा मतदारसंघात तालुकाध्यक्ष धनराज मुंगले निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. विद्यमान भाजप आमदार बंटी भांगडिया यांना त्यांनी विरोध केला आहे. दोघांनीही एकमेकांविरोधात केल्या होत्या तक्रारी, बहुजनांचा आवाज असा सूर आळवत मैदानात उतरले आहेत.

चंद्रपूर विधानसभा जागेसाठी भाजपचे उमेदवार नाना श्यामकुळे यांनी दाखल केला अर्ज, प्रचंड मोठ्या रॅलीसह भाजपने शक्तिप्रदर्शनकेले. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार माजी केंद्रीय मंत्री अहिर यांची उपस्थिती होती. विकासाच्या मुद्द्यावर चंद्रपूर मतदान करणार असल्याचा मुनगंटीवार यांनी दावा केला आहे. पाच वर्षातील कामगिरी पाहून मतदार भाजपलाच निवडतील असं श्यामकुळे यांचा विश्वास आहे.

आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदारसंघ

आंबेगाव आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदार संघातून विधानसभेचे माजी अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार दिलीप वळसे पाटील यांनी घोडेगाव इथे उमेदवारी अर्ज भरला आहे.

रायगडमध्ये बंडखोरी

रायगडमध्ये उरण विधानसभा मतदार संघ शिवसेनेकडे आहे तेथे शिवसेनेचे उमेदवार आहेत. परंतु मनोहर भोईर यांच्या विरोधात भाजपाचे जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे .

तर श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असताना आदिती तटकरे यांच्यासमोर काँग्रेसचे ज्ञानदेव पवार व मोईद शेख यांनी अर्ज दाखल केला आहे.

तर काँग्रेस राष्ट्रवादी महा आघाडीत शेकाप सामील झाली आहे. अलिबाग , पेण , पनवेल व उरण हे 4 मतदार यसंघ शेकापच्या वाट्याला आले आहेत. असे असताना अलिबाग , पेण व उरणमधून काँग्रेसने उमेदवार दिले आहेत. काँग्रेसची मते शिवसेना भाजपकडे वळू नयेत यासाठी इथं मैत्रीपूर्ण लढतीचा प्रयोग करण्यात आला आहे.

अलिबाग – ऍड .श्रद्धा ठाकूर
पेण – ऍड . नंदा म्हात्रे
उरण – डॉ . मनीष पाटील हे काँग्रेसचे उमेदवार असतील. आघाडीमध्ये महाडची जागा काँग्रेसला सोडण्यात आले असून तेथे माणिक जगताप निवडणूक लढवीत आहेत.

लासलगाव विधानसभा मतदारसंघ

येवलामधील लासलगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार संभाजी पवार यांनी शिवसेना कार्यालय ते तहसील कार्यालयापर्यंत जोरदार शक्तिप्रदर्शन करत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या विरोधात शिवसेनेचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी आमदार नरेंद्र दराडे, शिक्षक आमदार किशोर दराडे, माजी आमदार कल्याणराव पाटील हे उपस्थित होते. येवला-लासलगाव मतदारसंघात 36 इच्छुकांनी 75 अर्ज नेल्यानंतर ही उमेदवारी अर्ज दाखल करायचा शेवटच्या एक दिवस अगोदर शिवसेनेचे उमेदवार संभाजी पवार यांनी या निवडणुकीसाठी प्रथमच अर्ज दाखल केला आहे.

इंदापूर मतदारसंघ

राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज भारतीय जनता पक्षाकडून इंदापूर विधानसभा मतदारसंघात आपला उमेदवारी अर्ज इंदापूर येथील निवडणुक निर्णय अधिकारी यांच्या कडे दाखल केला. त्यांनी
निवडणुक उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी हजारो कार्यकर्त्यांसह मोठे शक्ती प्रदर्शन केले.

सातारा लोकसभा मतदारसंघ

सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीनिवास पाटील यांनी पोटनिवडणुकीचा अर्ज भरला आहे.

चांदवड देवळा मतदारसंघ

चांदवड देवळा मतदारसंघात आज काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार माजी आमदार शिरीष कोतवाल यांनी चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीपासून तहसील कार्यालयापर्यंत जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी दाखल करण्यासाठी माजी आमदार उत्तमबाबा भालेराव यांच्यासह मोठ्या प्रमाणात पदाधिकारी उपस्थित होते.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातून आज उमेदवारी अर्ज भरला.

मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघ

मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे विद्यमान आमदार आसिफ शेख यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. किदवाई रोडवरील काँग्रेस कार्यालयापासून रॅली काढण्यात आली होती. काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते. त्यांच्यासमोर माजी आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांचे मोठे आव्हान असून मुफ्ती इस्माईल यांनी तीन तलाखच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसला राजीनामा देत एमआयएममध्ये प्रवेश केल्याने मालेगाव मध्यमधून चुरशीची लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

तसेच तीन तलाखच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत एमआयएममध्ये दाखल झालेल्या मालेगावचे माजी आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी आज एमआयएमकडून मालेगाव मध्य मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मालेगाव शहरातून जोरदार शक्ती प्रदर्शन करीत रॅली काढली होती मौलाना मुफ्ती हे बैलगाडीवरून येत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसचे विद्यमान आमदार आसिफ व मौलाना मुफ्ती इस्माईल यांच्यात मालेगाव मध्य मतदारसंघात दुहेरी लढत रंगणार आहे.

लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे अधिकृत उमेदवार धीरज विलासराव देशमुख यांनी आज नामनिर्देशन पत्र दाखल केले. यावेळी विलास साखर कारखान्याचे चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख, राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, आमदार अमित विलासराव देशमुख, आमदार अँड त्रिंबक भिसे सिने अभिनेते रितेश देशमुख,माजी आमदार वैजनाथ शिंदे,रेणा साखर कारखान्याचे चेअरमन आबासाहेब पाटील आदी उपस्थित होते.

उमरगा मतदारसंघ

शिवसेनेचे उमरगा मतदारसंघाचे उमेदवार ज्ञानराज चौगुले यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.

पालघर- बोईसर विधानसभा मतदारसंघ

पालघर- बोईसर विधानसभेत युतीमध्ये बंडखोरी झाली असून भाजपचे संतोष जनाठे यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करीत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. बोईसर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला असून संतोष जनाठे हे भाजपकडून बोईसर मधून इच्छुक होते.

COMMENTS