विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी ‘या’ नेत्याची निवड, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडेंनी केली घोषणा !

विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी ‘या’ नेत्याची निवड, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडेंनी केली घोषणा !

मुंबई – विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाची आज निवड करण्यात आली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केली आहे. विखे पाटील यांनी विधानसभा सदस्याचा 4 जून रोजी राजीनामा दिल्याने विरोधी पक्षनेतेपद रिक्त झाले होते. त्यानंतर आज काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

आज सभागृहात माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विजय वडेट्टीवार यांचे हस्तांदोलन करून सभागृहात अभिनंदन
केले. तसेच मुख्यमंत्र्यांनीही वडेट्टीवार यांचेही अभिनंदन केले आहे. मुख्यमंत्री विदर्भातील आहेत आणि विरोधी पक्षनेताही विदर्भातील झाला आहे. त्यामुळे विदर्भाच्या विकासासाठी ही महत्त्वाची गोष्ट असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. मी चंद्रपूर जिल्ह्य़ातील आहे, विरोधी पक्षनेतेही चंद्रपूर जिल्ह्यातील असल्याचं यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही प्रतिक्रियै दिली आहे. सरकारवर अंकुश ठेवणारे विरोधी पक्षनेते होऊन गेले. विरोधी पक्षनेत्याने सक्षमपणे काम केलं तर जनमत बदलण्याची ताकद विरोधी पक्षनेत्यात असते हे अनेकवेळा सिद्ध झाले आहे. धोरणे चुकत असतील तर ती दुरुस्त करायला लावण्याची ताकद विरोधी पक्षनेत्यामध्ये आहे. कशालाही न भिणारे, कोणताही स्वार्थ नसणारे विजय वड्डेटीवार आहेत. आघाडी सरकार येण्याची ताकद निर्माण करण्यात वड्डेटीवार करतील अशी मला खात्री असल्याचं थोरात यांनी म्हटलं आहे.

COMMENTS