अटल बिहारी वाजपेयी यांना रुग्णालयात केलं दाखल !

अटल बिहारी वाजपेयी यांना रुग्णालयात केलं दाखल !

नवी दिल्ली – माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याची माहिती आहे . वाजपेयी यांना नियमित तपासणीसाठी दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वाजपेयी यांना  रुग्णालयात दाखल केल्यानंतर तातडीने भाजपने पत्रक काढून त्यासंदर्भात माहिती दिली आहे. एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या देखरेखीखाली अटल बिहारी वाजपेयी यांची तपासणी केली जाणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान अटल बिहारी वाजपेयी यांचं वय सध्या 93 वर्ष असून वृध्दापकाळामुळे त्यांच्या तपासण्या केल्या जातात. याबाबत आज त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची नियमीत तपासणी केली जाणार असून त्यानंतर त्यांना डिस्चार्ज दिला जाणार असल्याची माहिती आहे. माजी पंतप्रधान असलेले अटल बिहारी वाजपेयी हे सध्या राजकारणापासून पूर्णपणे अलिप्त आहेत.

 

COMMENTS