माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं निधन !

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं निधन !

दिल्ली – माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं निधन झालं आहे. थोड्यावेळापूर्वी त्यांनी  दिल्लीच्या एम्स रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला. गेल्या 9 आठवड्यापासून ते एम्स रुग्णालयात दाखल होते. मात्र गेल्या दोन तीन दिवसांपासून त्यांची प्रकृती आणखीनच खालावली. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. गेल्या 24 तासात प्रकृती आणखी खालावली आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एम्स रुग्नालयाने अटलजींच्या मृत्यूबाबत एक मेडिकल बुलेटिन जारी केले आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाने देशभर शोककळा पसरली आहे.

दरम्यान वाजपेयी यांचे पार्थिव उद्या सकाळी6 ते 10 त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात  येणार आहे. त्यानंतर 10 ते एक भाजपा कार्यालयात व दुपारी एक वाजता अंत्ययात्रा सुरू होणार. तसेच राजघाट येथे संध्याकाळी 5 च्या सुमारास त्यांच्यावर  अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

अटलबिहारी वाजपेयी हे तीन वेळा देशाचे पंतप्रधान होते. 1996 मध्ये अटलजी केवळ 13 दिवस पंतप्रधान होते. त्यानंतर 1998 ते 1999 या काळत अटलजी 13 महिने पंतप्रधान होते. त्यानंतर ते सलग 5 वर्ष पंतप्रधान होते. बिगर काँग्रेसचे सलग 5 वर्ष राहिलेले ते पहिलेच पंतप्रधान होते. अटलजी 10 वेळा लोकसभा तर दोन वेळा राज्यसभेवर निवडून गेले होते. भाजपचे अनेकवेळा ते अध्यक्षही राहिले होते.  भाजपाच्या स्थापनेपासून ते पक्षात सक्रीय होते. दोन खासदारांपासून सुरू झालेला भाजपचा प्रवास सत्तेपर्यंत पोहचवण्यात अटलजींचा मोठा वाटा होता.

COMMENTS