नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्यावर गोळीबार !

नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्यावर गोळीबार !

नागपूर – नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. बाईकवर आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी संदीप जोशी यांच्या चालत्या कारवर 3 गोळ्या झाडल्या.तिन्ही गोळ्या संदीप जोशी यांच्या कारला लागल्या. वर्धा मार्गावर एम्प्रेस पॅलेस हॉलच्या वळणावर रात्री 12 वाजून 5 मिनिटांच्या सुमारास हा हल्ला झाला. यामध्ये ते थोडक्यात बचावले आहेत.

संदीप जोशी रात्री कुटुंबीय आणि काही मित्रांसह नागपूरच्या आऊटर रिंग रोड वरील “रस रंजन” धाब्यावर जेवायला गेले होते. संदीप जोशी यांच्या लग्नाचा वाढदिवस असल्याने कुटुंबीयांनी तिथे कौटुंबिक कार्यक्रम आयोजित केला होता.यावेळी सर्व जण परत येत असताना 12 वाजून 5 मिनिटांना संदीप जोशी यांची कार सर्वात मागे असताना 2 बाईक्स वर आलेल्या हल्लेखोरांनी एकानंतर एक तीन गोळ्या झाडल्या.

सर्व गोळ्या कारच्या काचेवर लागून आत सीट्स मध्ये शिरल्या. ड्रायव्हर सीट वर बसलेले संदीप जोशी काही इंचानी बचावले आहेत. प्राथमिक अंदाजानुसार हल्लेखोर काल रात्री पासूनच संदीप जोशी यांचा पाठलाग करत असावेत असं बोललं जात आहे. या हल्ल्यानंतर जोशी यांनी मला 6 डिसेंबर रोजी पहिली तर 12 डिसेंबर रोजी दुसरी धमकी आली होती. त्यामुळे हल्लेखोर मागावर असावेत, असा संशय असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

COMMENTS