शिवसेना आमदारावर जीवघेणा हल्ला, हल्ल्यातून थोडक्यात बचावले !

शिवसेना आमदारावर जीवघेणा हल्ला, हल्ल्यातून थोडक्यात बचावले !

मुंबई – शिवसेना आमदारावर काल मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञातांनी हल्ला केला आहे. मुंबईतील अणूशक्तीनगर मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार तुकाराम काते यांच्यावर हा हल्ला झाला आहे. मानखुर्द येथील महाराष्ट्र नगर येथील मेट्रो-३च्या परिसरात ही घटना घडली असून या हल्ल्यातून काते थोडक्यात बचावले आहेत. परंतु त्यांच्या सुरक्षारक्षकासह अन्य दोन जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान महाराष्ट्र नगर परिसरात सुरू असलेल्या मेट्रो कारशेडच्या कामामुळे त्रास होत असल्याची तक्रार स्थानिक रहिवाशांची केली होती. त्यासाठी दोन दिवसांपूर्वीही काम थांबवण्यासाठी शिवसेनेनं मोर्चा काढला होता. तसेच शुक्रवारी महाराष्ट्र नगर परिसरात मेट्रो कारशेडचे काम शिवसैनिकांनी बंद पाडले होते. तेथून परतत असतानाच काते यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची माहिती असून मेट्रोच्या कंत्राटदारांनेच हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप काते यांनी केला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

COMMENTS