काँग्रेस आमदार अब्दुल सत्तारांचा ‘या’ अपक्ष उमेदवाराला पाठिंबा!

काँग्रेस आमदार अब्दुल सत्तारांचा ‘या’ अपक्ष उमेदवाराला पाठिंबा!

औरंगाबाद – औरंगाबादचे काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी लोकसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार आणि शिवसेना बंडखोर नेते हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा जाहीर केला आहे. अब्दुल सत्तार यांनी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून अपक्ष अर्ज भरला होता. मात्र दिलजमाई झाल्यानंतर सत्तार यांनी अर्ज मागे घेतला. परंतु हर्षवर्धन जाधवांना त्यांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे याठिकाणी आघाडी आणि युतीचे उमेदवार असलेले विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांना धक्का बसणार असलेयाचा अंदाज वरेतवला जात आहे.

दरम्यान हर्षवर्धन जाधव हे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत.मध्यंतरी रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार हे मुंबईला मुख्यमंत्र्यांना भेटले होते, हर्षवर्धन यांनीही आपण निवडून आल्यास नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्याचं सांगितलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

COMMENTS