काँग्रेसला धक्का, अब्दुल सत्तार आज करणार भाजपमध्ये प्रवेश?

काँग्रेसला धक्का, अब्दुल सत्तार आज करणार भाजपमध्ये प्रवेश?

मुंबई – काँग्रेसला मोठा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. पक्षाला सोडचिठ्ठी देऊन औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी दाखल केलेले सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार हे भाजपात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण अब्दुल सत्तार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यामध्ये काल रात्री औरंगाबादमधील चिकलठाणा विमानतळावरील व्हीआयपी कक्षात अर्धा तास बैठक झाली. त्यानंतर ते दोघे एकाच विमानाने मुंबईत आले. त्यामुळे सत्तार हे भाजपात दाखल होणार असल्याची चर्चा आहे.

दरम्यान पक्षाने आपल्याला डावलून सुभाष झांबड यांना तिकीट दिले. त्यामुळे नाराज झालेल्या सत्तार यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आणि अपक्ष उमेदवारी जाहीर केली. तत्पूर्वी त्यांनी २३ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली होती. त्यामुळे आज ते भाजपमध्ये जाऊ शकतात असं बोललं जात आहे.

COMMENTS