माजी खासदार म्हटल्यामुळे चंद्रकांत खैरे चिडले, विद्यमान खासदार इम्तियाज जलील  यांनीही काढला चिमटा !

माजी खासदार म्हटल्यामुळे चंद्रकांत खैरे चिडले, विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांनीही काढला चिमटा !

औरंगाबाद – एका कार्यक्रमात माजी खासदार म्हटल्यामुळे शिवसनेचे नेते चंद्रकांत खैरे चांगलेच चिडले असल्याचे पहावयास मिळाले. यावेळी विद्यमान खासदार असलेले इम्तियाज जलील यांनीही खैरेंना चिमटा काढला आहे.
बांधकाम व्यावसायिकांची संघटनेच्या कार्यक्रमात खैरे यांना सतत माजी खासदार संबोधण्यात आल्याने ते भडकले. मी कार्यक्रमात आल्यापासून बघतोय माझा उल्लेख माजी खासदार म्हणून केला जातोय. काय माजी खासदार, माजी खासदार लावलंय… मी आजही शिवसेनेचा नेता आहे आणि लोक माझ्याकडे त्यांची कामे घेऊन येतात असं खैरे यांनी म्हटलं.

या कार्यक्रमाला चंद्रकांत खैरे, खासदार इम्तियाज जलील यांच्यासह राजकीय पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बाजूलाच असलेले एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांनीही खैरेंना चिमटा काढण्याची संधी सोडली नाही. “मी खासदार झालोय, याच्यावर अजूनही काही लोकांचा विश्वासच बसत नाही,” असा टोला त्यांनी खैरेंना लगावला.

COMMENTS