हिंदूंच्या नादाला लागू नका अन्यथा मोठे परिणाम भोगावे लागतील – चंद्रकांत खैरे

हिंदूंच्या नादाला लागू नका अन्यथा मोठे परिणाम भोगावे लागतील – चंद्रकांत खैरे

औरंगाबाद – शिवसेनेचे नेते आणि औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी हिंदूंच्या नादाला लागू नका अन्यथा मोठे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला आहे. गुरुवारी मध्यरात्री जिन्सी पोलीस स्थानका समोरील काही हिंदू घरांवर समाजकंठकांकडून दगडफेक करण्यात आली होती. यावेळी गाड्यांचीही तोडफोड करण्यात आली होती. यावरून चंद्रकांत खैरे यांनी दगडफेक करणाऱ्यांना इशारा दिला आहे.

शिवसेनेनं कधीच जाती-धर्माचं राजकारण केलं नाही, मात्र जातीवादी आणि धर्मांध लोकांना माफीही दिली नाही. त्यामुळे हिंदूंच्या नादाला लागू नका अन्यथा मोठे परिणाम भोगावे लागतील असा इशारा त्यांनी दिला आहे.आज
दगडफेकीत जखमी झालेल्या थोरात कुटुंबीयांची त्यांनी भेट घेऊन त्यांची विचारपुस केली.तसेच दगड फेकीत झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणीहा त्यांनी केली आहे.

COMMENTS