औरंगाबादमध्ये कोरोनामुळे शिवसेनेच्या आणखी एका नगरसेवकाचं निधन !

औरंगाबादमध्ये कोरोनामुळे शिवसेनेच्या आणखी एका नगरसेवकाचं निधन !

औरंगाबाद – राज्यात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असून कोरोनाबळींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनामुळे काही नेत्यांचा मृत्यू झाला आहे. अशातच आता औरंगाबादमध्ये कोरोनामुळे
शिवसेनेच्या आणखी एका नगरसेवकाचं निधन झालं आहे.शिवसेना नगरसेवक रावसाहेब आमले यांचं निधन झालं असून कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. पहाटे 4 च्या सुमारास त्यांचं निधन झालं आहे. सलग दुसऱ्या दिवशी आणखी एक नगरसेवक दगावला असून काल शिवसेना नगरसेवक नितीन साळवी यांचे ही कोरोनामूळं निधन झालं होतं.

नितीन साळवे यांच्यावर सात दिवसांपासून उपचार सुरु होते. मात्र काल उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ते औरंगाबादच्या बालाजी नगर वार्डातून शिवसेनेचे नगरसेवक होते. दरम्यान कोरोनामुळे आतापर्यंत राष्ट्रवादीच्या दोन आणि शिवसेनेच्या तीन नगरसेवकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाचा धोका वाढत असल्याचं दिसत आहे.

COMMENTS