औरंगाबाद मतदारसंघासाठी काँग्रेसकडून 14 पैकी तीन उमेदवारांची नावं निश्चित !

औरंगाबाद मतदारसंघासाठी काँग्रेसकडून 14 पैकी तीन उमेदवारांची नावं निश्चित !

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं 26 मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांची यादी तयार केली आहे. या यादीमध्ये औरंगाबाद मतदारसंघातील तब्बल 14 इच्छुकांनी आपली नावे दिली होती. यामध्ये जिल्हाध्यक्ष, आमदार अब्दुल सत्तार, सुभाष झांबड, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, जगन्नाथ काळे, प्रा. रवींद्र बनसोड, यांच्यासह चौदा इच्छुकांनी आपली नावे दिली होती. त्यापैकी तीन जणांची नावे अंतिम मंजुरीसाठी निवडण्यात आली आहेत. यामध्ये प्रा. रविंद्र बनसोड यांच्यासह कल्याण काळे, सुभाष झांबड यांची नावे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान या तिघांची नावे दिल्लीला पाठविण्यात आली असून यापैकी एका नेत्याला उमेदवारी दिली जाणार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसकडून औरंगाबाद मतदारसंघात कोणाला संधी मिळणार याकडे लक्ष लागलं आहे.

तर दुसरीकडे गेली चार निवडणुकांमध्ये या मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार पराभूत होत आला आहे. त्यामुळे या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रयत्न सुरु आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादीने पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण यांना तयारीला लागण्याचे आदेशही दिले होते. त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेसबरोबर राष्ट्रवादीचीही तयारी सुरु असल्याचं दिसत आहे. आता औरंगाबाद मतदारसंघ कोणाच्या पारड्यात पडतो हा निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार असल्यामुळे पक्षश्रेष्ठींच्या या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS