औरंगाबादमध्ये भाजपला महाविकास आघाडीचा धक्का !

औरंगाबादमध्ये भाजपला महाविकास आघाडीचा धक्का !

औरंगाबाद – औरंगाबाद महापालिकेत महाविकास आघाडीनं भाजपला आणखी एक धक्का दिला आहे. उपमहापौर पदाच्या निवडणुकीत शिवसेनेनं बाजी मारली आहे. आज उपमहापौरपदासाठी मतदान झालं. या निवडणुकीत शिवसेनेच्या राजेंद्र जंजाळ यांनी विजय मिळवला आहे. उपमहापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तीनही पक्ष एकत्र आल्याने भाजपला आणखी एक धक्का बसला आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच भाजपच्या उपमहापौरांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर उपमहापौर पदासाठी आज निवडणूक पार पडली. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये असलेले शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी ही निवडणूक एकत्र लढवली. त्यामुळे शिवसेनेच्या राजेंद्र जंजाळ यांनी 51 मते घेत विजय मिळवला. तर भाजप पुरस्कृत उमेवादाराला 33 तर एमआयएम ला 18 मते मिळाली.

COMMENTS