लोकसभेसाठी औरंगाबादमध्ये तगडा उमेदवार देण्यासाठी भाजपची चाचपणी, तीन दिग्गज नेत्यांनी घेतली शांतीगिरी महाराजांची भेट, पहा भेटीचे एक्सक्लुझीव्ह फोटो !

लोकसभेसाठी औरंगाबादमध्ये तगडा उमेदवार देण्यासाठी भाजपची चाचपणी, तीन दिग्गज नेत्यांनी घेतली शांतीगिरी महाराजांची भेट, पहा भेटीचे एक्सक्लुझीव्ह फोटो !

औरंगाबाद – सध्याच्या स्थितीत आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक शिवसेना आणि भाजप स्वबळावर लढण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांनी राज्यातल्या सर्व 48 जागांवर तयारी सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून दोन्ही पक्ष प्रत्येक जागेवर कोण तगडा उमेदवार राहील याबाबत चाचपणी करत आहेत. याचाच भाग म्हणू भाजपच्या तीन दिग्गज नेत्यांनी काही दिवसांपूर्वी शांतीगिरी महाराज यांची भेट घेतली. त्यामध्ये त्यांना 2019 मध्ये औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून लढण्याची गळ घातल्याची चर्चा आहे. मात्र दोन्ही बाजूंकडून याबाबत अजून उघडपणे कोणीही बोलायला तयार नाही. उलट या भेटीबाबत अत्यंत गुप्तता पाळण्यात आली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूलमंत्री चंद्रकांत दानवे आणि हरीभाऊ बागडे या तीन नेत्यांनी शांतिगीर महाराज यांची भेट घेतली होती.

शांतीगिरी महाराज हे औरंगाबाद जिल्ह्यातील बडे प्रस्त. जिल्ह्यात त्यांचा मोठा भक्तवर्ग आहे. त्यांनी 2009 च्या निवडणुकीत चंद्रकांत खैरेंविरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळी अपक्ष असतानाही त्यांना तब्बल 1 लाख 48 हजार मते मिळाली होती. त्या निवडणुकीत शांतीगिरी महाराजांनी चंद्रकांत खैरेंची चांगलीच दमछाक केली होती. त्यामुळे शांतीगिरी महाराज भाजपचे उमेदवार झाले तर खैरेंना फटका बसू शकतो. खतरंतर शांतीगिरी महाराजांचा नेहमीच शिवेसनेच्या चंक्रकांत खैरेंना पाठिंबा राहिला आहे. शिवसेनेची ताकद, खरैंचे वजन आणि शांतीगिरी महाराज यांचा पाठिंबा यामुळे खैरेंना फारसे आव्हान कुणी दिले नव्हते. मात्र 2009 मध्ये त्यांच्यातले संबंध बिघडले आणि दोघे एकमेकांच्या समोर उभे राहिले. त्यामुळे कसाबासा खैरैनी विजय मिळवला असला तरी त्यांची चांगलीच दमछाक झाली होती.

शांतीगिरी महाराजांचा भक्तवर्ग शहरापेक्षा औरंगाबाद जिल्ह्याच्या ग्रामिण भागात मोठ्या प्रमाणातत आहे. त्याची प्रचिती 2009 च्या निवडणुकीत आली होती. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शहरातील 3 आणि ग्रामिणमधील तीन असे विधानसभेचे 6 मतदारसंघ आहेत. त्यापैकी ग्रामिण मधील 3 पैकी दोन मतदारसंघात शांतीगिरी महाराजांना खैरेंपेक्षा जास्त मते होती. ग्रामिण मतदार संघातील गंगापूर, वैजापूर आणि कन्नड या तीन मदारसंघात शांतीगिरी महाराजांना सुमारे 1 लाख 30 हजार मते मिळाली होती. तर खैरेंना जवळपास तेवढीच मते मिळाली. शहरात भाजपची वाढलेली मते आणि ग्रामिणमध्ये भाजपचा वाढलेला जनाधार त्यामुळे शांतिगीरी महाराज  भाजपच्या तिकीटीवार लढल्यास बाजी मारु शकतात असा भाजपच्या नेत्यांना विश्वास आहे. त्यामुळेच त्यांना पक्षाकडून विचारणा होत आहे. मात्र 2009 च्या निवडणुकीनंतर शांतिगीरी महाराज काहीसे राजकारणापासून अलिप्त राहिले होते. आता ते काय भूमिका घेतात याकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS