पंतप्रधान नरेंद्र मोदी विष्णूचे 11 वे अवतार – अवधूत वाघ

पंतप्रधान नरेंद्र मोदी विष्णूचे 11 वे अवतार – अवधूत वाघ

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे 11 वे अवतार असल्याचं ट्वीट भाजपाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी केलं आहे. हिंदू संस्कृतीत ३३ कोटी देव आहेत, पंचमहाभुतं आहेत, भारतमातेला आपण देव मानतो. अगदी त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी हे देशाचे प्रधानसेवक असून ते भारतमातेची सेवा ज्याप्रकारे करत आहेत त्यामुळे आमच्यासाठी ते देवासमानच असल्याचं वाघ यांनी म्हटलं आहे. तसेच याच भावनेतून मी त्यांना विष्णूचा ११ वा अवतार म्हटलं असल्याचंही वाघ बोलले आहेत.

आम्हाला मोदी भक्त म्हटलं जातं अंध भक्त नाही त्यामुळे जे बोललो आहे ते माझ्या मनात मोदींबाबत जी भावना आहे त्या भावनेतूनच बोललो असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. प्रभू राम यांनी जन्म घेतला तो जगाच्या कल्याणासाठी. कृष्णानेही देवकीच्या पोटी जन्म घेतला होता तसेच नरेंद्र मोदी हे आमच्यासाठी देवच आहेत असेही वाघ यांनी सांगितले. सगळ्यांसाठी चांगलं काम करणाऱ्या नरेंद्र मोदींना आम्ही देवच मानतो त्यात काहीही गैर नाही असंही अवधूत वाघ यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS