दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकाबाबत महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय!

दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकाबाबत महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय!

मुंबई – दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकाबाबत महाविकास आघाडी सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकाची उंची वाढण्याचा निर्णय सरकारनं घेतला असून स्मारकातील आंबेडकर यांचा पुतळा अडीचशे फुट होता, त्याची उंची वाढवून आता ३५० फुट होणार
आहे. याबाबत ठाकरे सरकारनं नवा प्रस्ताव आणला आहे.

दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकाची उंची वाढवल्यामुळे पुतळ्याचा खर्च देखील वाढणार आहे.709 कोटींचा खर्च आता 990 कोटी होणार आहे. या स्मारकाला 100 फुटांचा पायथा असणार असून आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत हा प्रस्ताव सहमत झाला असून पुढील दोन वर्षात हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे.

COMMENTS