आरक्षणाबाबत फक्त उडवाउडवीचे उत्तरं येत असल्याने आंदोलनाची वेळ  – बच्चू कडू

आरक्षणाबाबत फक्त उडवाउडवीचे उत्तरं येत असल्याने आंदोलनाची वेळ – बच्चू कडू

नाशिक – सरकारमध्ये स्पष्टता नसल्याने आंदोलनाची वेळ येत असल्याची जोरदार टीका आमदार बच्चू कडू यांनी केली आहे.तसेच सरकारकडून आरक्षणाबाबत फक्त उडवाउडवीचे उत्तर येत असल्याने आंदोलनाची वेळी आली असल्याचंही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. कोर्टात केस आहे आणि आदिवासी आयोगाकडे केस आहे. असे सांगत असल्यानं मुख्यमंत्र्यांच्या या शब्दांवर कार्यकर्त्याचा विश्वास बसत नसल्याची टीकाही बच्चू कडू यांनी केली आहे. ते नाशिकमधील एका कार्यक्रमात बोलत होते.

दरम्यान असल्या उडवाउडवीच्या उत्तरांमुळे सरकारची विश्वासहार्यता संपली असून सरकारनं विश्वासहार्यता आणण्यासाठी काम केलं पाहिजे असंही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. तसेच सरकारनं या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं तर हे आंदोलन आणखी चिघळू शकते अशी शक्यताही यावेळी बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे.

COMMENTS