…त्यासाठी मी पंकजा मुंडेंच्या बंगल्यावर गेलो होतो – बजरंग सोनावणे

…त्यासाठी मी पंकजा मुंडेंच्या बंगल्यावर गेलो होतो – बजरंग सोनावणे

बीड – बीड लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनावणे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
काल सोनावणे हे पंकजा मुंडे यांच्या बंगल्यावर गेले होते. त्यांच्या बंगल्यावरील फोटो पाहून सोनावणे देखील भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. परंतु
त्यामध्ये काहीही तथ्य नसल्याचं बजरंग सोनावणे यांनी म्हटलं आहे. बीडमधील अपात्र नगरसेवकांवरील सुनावणी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या बंगल्यावर ठेवली होती. या प्रकरणात बजरंग सोनावणे हे याचिकाकर्ते आहेत, ते तिथे सुनावणीसाठी गेले होते. मात्र आपण सुनावणीसाठी गेल्यानंतर तिथे फोटो काढून ते व्हायरल करण्यात आल्याचा दावा सोनावणे यांनी केला आहे.

दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस -राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे एखाद्या नेत्यानं काही कामानिमीत्त भाजप नेत्याची भेट घेतली तर ते भाजपातच जाणार असल्याची अफवा पसरवली जात आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली होती. या भेटीनंतरही अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. परंतु आपण मतदारसंघातील कामाची चौकशी करण्यासाठी पाटील यांची भेट घेतली असल्याचं तटकरे यांनी म्हटलं होतं.

आता हे प्रकरण ताज असतानाच बीड लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनावणे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काल सोनावणे हे पंकजा मुंडे यांच्या बंगल्यावर गेले होते. त्यांच्या बंगल्यावरील फोटो पाहून सोनावणे देखील भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. परंतु बीडमधील अपात्र नगरसेवकांवरील सुनावणी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या बंगल्यावर ठेवली होती. या प्रकरणात बजरंग सोनावणे हे याचिकाकर्ते आहेत, ते तिथे सुनावणीसाठी गेले होते. मात्र आपण सुनावणीसाठी गेल्यानंतर तिथे फोटो काढून ते व्हायरल करण्यात आल्याचा दावा सोनावणे यांनी केला आहे.

COMMENTS