“या” ठिकाणी व्हावं बाळासाहेबांचं स्मारक, उद्धव-पवार भेटीत पवारांची सूचना !

“या” ठिकाणी व्हावं बाळासाहेबांचं स्मारक, उद्धव-पवार भेटीत पवारांची सूचना !

नाशिक – काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची बातमी आली होती. त्या बैठकीत राजकीय चर्चा झाल्याच्या बातमीनं एकच खळबळ उडाली होती. या गुप्त बैठकीत नेमकी चर्चा काय झाली याची अधिकृत माहिती समोर आली नव्हती. काल नाशिकमध्ये शरद पवार यांनी या भेटीबाबत अधिकृत माहिती देताना बाळासाहेबांच्या स्मारकाबाबत चर्चा झाल्याची माहिती दिली. बाळासाहेबांचे स्मारक शिवाजी पार्कमध्ये व्हावे अशी आपण सूचना केल्याची माहितीही पवार यांनी पत्रकारांना दिली. बाळासाहेबांचं आणि शिवाजी पार्कचं नातं वेगळं आहे. त्यामुळे शिवाजी पार्कला बाळासाहेबांचं स्मारक व्हायला हवं असं पवार म्हणाले. या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही अशी माहितीही पवार यांनी दिली.

सरकारचा पाठिंबा काढण्याबाबत सामनातून येणा-या बातम्यांवरुनही पवारांनी शिवसेनेची फिरकी घेतली. मी सामनातून नेमकीच काही तरी होणारं असं ऐकतो. पण काहीच होत नाही. पुढची दोन वर्षही अशीच जातील असा टोला शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना लावला.

COMMENTS