कुणी आम्हाला विदर्भप्रेम शिकवू नये

कुणी आम्हाला विदर्भप्रेम शिकवू नये

नागपूर – गोरेवाडा प्राणिसंग्रहालय उद्यानास बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिल्याने त्याच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. पार्श्वभूमीवर कार्यक्रमात उद्घाटनप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी विरोध करणाऱ्यांना इशारा दिला आहे.

विदर्भाशी आमचे रक्ताचे नाते आहे आणि त्यामुळे कुणी आम्हाला विदर्भप्रेम शिकवू नये. यापूर्वी विदर्भाकडे कदाचित +दुर्लक्ष झाले असेल मात्र विकासाच्या बाबतीत यापुढे असे होणार नाही. विकासाचा वाघ आता मजबुतीने पावले टाकेल आणि विरोधकांची दाणादाण उडेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

नागपुरातील बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा प्राणिसंग्रहालय उद्यानाचे उद्घाटन मंगळवारी मुख्यमंत्र्य़ांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात व्यासपीठावर गृहमंत्री अनिल देशमुख, वनमंत्री संजय राठॊड, नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, खासदार कृपाल तुमाने, महापौर दयाशंकर तिवारी, जिल्ह्यातील आमदार, मुख्यमंत्र्यांचे सचिव विकास खारगे, वन विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, वन विभाग प्रमुख एन. रामबाबू, महाराष्ट्र वन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक एन. वासुदेवन, वन्यजीव विभाग प्रमुख नितीन काकोडकर, विभागीय आयुक्त संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महापालिकेचे आयुक्त बी. राधाकृष्णन तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

येथील विकासाला चालना देण्यासाठीच काही दिवसांपूर्वी गोसेखुर्द प्रकल्पाला भेट दिली. गोरेवाडासारखा महत्वपूर्ण प्रकल्पही आता सुरू होणार आहे. आदिवासी समाजाच्या मुद्द्यावरुन गेले काही दिवस अस्वस्थता आहे. मात्र, आदिवासींची संस्कृती आणि इतिहास यांचे दर्शन घडविणार गोंडवाना थीम पार्क याच प्रकल्पात उभारला जाईल.

COMMENTS