नवीन बाटली जुनी दारू, केंद्राच्या बजेटवर मंत्री बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया ! VIDEO

नवीन बाटली जुनी दारू, केंद्राच्या बजेटवर मंत्री बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया ! VIDEO

मुंबई – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज 2020-21 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर मंत्री बाळासाहेब थोरात यांनी टीका केली आहे. ह्या बजेटमध्ये नवीन काही नाही, नवी बाटली जुनी दारू आहे.
सगळ्यात मोठी निराश महाराष्ट्र आणि मुंबईची झाली असल्याचं थोरात यांनी म्हटलं आहे.

मुंबई आणि महाराष्ट्र सगळ्यात जास्त कर देशाला देतो. शेतकर्यांचे उत्पन्न डबल करणार आधी सांगितलेलं,पण शेतीचा दर डबल कसे करणार.100 स्मार्ट सिटीचं काय झालं? सर्वसामान्य नागरिकांना काय सुविधा दिल्या. अर्थव्यवस्था मोडकळीला गेली,शेअर बाजार कोसळला, हे कसलं निदर्शक आहे असंही थोरात म्हणालेत. तसेच नवा रोजगार तयार होत नाही,विकास थांबत आहे. बुलेट ट्रेनचा फायदा महाराष्ट्राला काय? पण वाटा राज्याचा जास्त घेत आहे त्यामुळे फसव्या घोषणा केल्या असल्याची टीका थोरात यांनी केली आहे.

COMMENTS