आगामी काळात आघाडीचंच सरकार येणार – बाळासाहेब थोरात VIDEO

आगामी काळात आघाडीचंच सरकार येणार – बाळासाहेब थोरात VIDEO

मुंबई – केंद्रीय निवडणूक आयोगानं आज पत्रकार परिषद घेऊन राज्यातील निवडणुकांची तारीख जाहीर केली आहे. या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे.  महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा आहेत. तसेच विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबरपर्यंत आहे. महाराष्ट्र आणि हरियाणात आजपासून अचारसंहिता जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रात 21 तारखेला मतदान घेण्यात येणार आहे. तर 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. तसेच 27 सप्टेंबरपासून उमेदवारांना अर्ज भरता येणार आहेत. नामनिर्देशन पत्राची अंतिम मुदत ४ ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. तसेच याची छाननी – ५ ऑक्टोबररोजी होणार आहे. तर ७ ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत.

दरम्यान निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही निवडणुकीसाठी पूर्णपणे सक्षम आणि तयार आहोत असं थोरात यांनी म्हटलं आहे. तसेच भाजप सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं असून जनतेपुढे अनेक समस्या आहेत. त्या समस्या आमचं सरकार सोडवणार आहे. पुढील काळात आमचंच सरकार येणार असल्याचा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला आहे.

COMMENTS