महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांना विविध ठिकाणी काम करण्याची संधी, राज्य सरकारनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय! VIDEO

महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांना विविध ठिकाणी काम करण्याची संधी, राज्य सरकारनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय! VIDEO

मुंबई – महाविकास आघाडीचं सरकार महामंडळ आणि समित्यांवरील नियुक्त्या लवकरच करणार आहे. पुढच्या पंधरा दिवसात महामंडळ आणि समितींचे वाटप करण्याचा महाविकास आघाडीनं निर्णय घेतला असून काल मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याचं मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

या बैठकीत सरकारच्या आतापर्यंतचा कामगिरीचाही आढावा घेण्यात आला आहे.
वादग्रस्त विधानं करण्या-या नेत्यांवरही कालच्या बैठकीत चर्चा झाली असल्याचं थोरात यांनी म्हटलं आहे. सार्वजनिकरित्या पक्षाला आणि सरकारला अडचणीत आणणारी वादग्रस्त विधान टाळावीत अशा कडक सूचना पक्षातील नेत्यांना करण्याचा तीनही पक्षांनी निर्णय घेतला असून गेल्या काही दिवसात महाविकास आघाडीतील काही नेत्यांच्या विधानामुळे वाद निर्माण झाले होते, हे टाळावे असा सूर बैठकीत होता असंही थोरात यांनी म्हटलं आहे.

COMMENTS